दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २०
"खरंच हि मुलगी त्या सिनियर्सने सांगितल्याप्रमाणे करेल का...?" काहींच्या मनात असे प्रश्न निर्माण करत होते...
तर "हि बहुतेक ऐकणाऱ्यातली वाटतं नाही... हि ह्यांना चांगलीच अद्दल घडवेल..." असं काहींच्या मनात विचार येत होते...
तर काहीजण... " बिचारी हि सुद्धा आमच्या सारखी एक रॅगिंगची शिकार होणार..." असं काहींच्या मनात विचार येत होते...
तर काहींच्या मनात विचार येत होते कि... "बिचारी... हिने जर त्यांचं म्हणणं मान्य केले तर तीला त्यांचा गुलाम व्हावे लागेल... आणि ती जर गुलाम झाली तर ते तिच्या सोबत कसे वागतील...? बापरे तिला किती त्रास भोगावा लागेल..."
पण झाले मात्र उलटेच...
"एक प्रश्न विचारू...?" गौरवी माधवच्या डोळ्यात डोळे घालून विचारते...
माधव क्षणभर दचकतो… मग मग्रुरीने म्हणतो,
“विचार…”
“विचार…”
"हे कॉलेज तुमच्या आजोबांनी बांधलंय का...?" गौरवी शांत आणि मृदू आवाजात विचारते...
"नाही..." माधव खांदे उडवत हसत म्हणाला...
आणि त्याचे ते टुकार मित्र सुद्धा दात काढू लागले...
आणि म्हणू लागले...
" मग काय तुझ्या खापरपणजोबाने कॉलेज बांधलाय का...?"
असे म्हणत एकमेकांना टाळ्या देत... थट्टेने आपली बत्तीशी काढू लागली...
आणि त्याचे ते टुकार मित्र सुद्धा दात काढू लागले...
आणि म्हणू लागले...
" मग काय तुझ्या खापरपणजोबाने कॉलेज बांधलाय का...?"
असे म्हणत एकमेकांना टाळ्या देत... थट्टेने आपली बत्तीशी काढू लागली...
तेव्हा गौरवी चिडते... ती थेट त्यांच्या दिशेने पाहत ठामपणे बोलते...
"ऐ... झाकण झुल्यानों..., हाडांची काडे आणि ढुंगणांचा तुणतुणा झाला आहे तुमचा... आपल्या आईबापांच्या पैशांच्या जीवावर असलेले तुम्ही परजीवी... सुकलेले बोंबील...
एक मुस्कटात ठेवून दिली ना तर सरळ गेटच्या बाहेर जाऊन पडाल कळलं..." गौरवी चांगलीच त्या माधवच्या टुकार मित्रांची कानउघाडणी करते...

“नाद करू नका माझा,” ती पुढे म्हणते,
“कारण मी घाबरणाऱ्यांतली नाही...”
“कारण मी घाबरणाऱ्यांतली नाही...”
तिच्या आवाजात धार होती... आणि डोळ्यांत आत्मविश्वास झळकत होता...
मग ती माधवकडे वळते...
“आणि तु ऐ...,”
“आणि तु ऐ...,”
ती शांतपणे, पण राग दाबून बोलते,
"स्वतःला काय हिरो समजतोस का...? थोबाड ठिकठाक आहे पण गुण आणि विचार तर मात्र सैतानासारखे आहेत...
"स्वतःला काय हिरो समजतोस का...? थोबाड ठिकठाक आहे पण गुण आणि विचार तर मात्र सैतानासारखे आहेत...
ती थोडी पुढे येते...
“जेव्हा हे कॉलेज तुमच्या आजोबांनी बांधलेलं नाही ना...,
तेव्हा इथे कोण वाकणार, आणि कोण गुलाम म्हणणार
हा अधिकार तुम्हाला कुणी दिला…?”
“जेव्हा हे कॉलेज तुमच्या आजोबांनी बांधलेलं नाही ना...,
तेव्हा इथे कोण वाकणार, आणि कोण गुलाम म्हणणार
हा अधिकार तुम्हाला कुणी दिला…?”
गौरवी शांतपणे पण आवाजात थोडासा राग आणत बोलते...
माधवचा चेहरा लालबुंद होतो...
माधवचा चेहरा लालबुंद होतो...
"फार बोललीस... जास्त शहाणी होऊ नकोस... रॅगिंग म्हणजे कॉलेज कल्चर आहे... आणि तो आमचा सिनियर स्टुडंट्सचा अधिकार आहे..." तो चिडून म्हणतो...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."